शिक्षण-प्रशिक्षण

मेहकर-चिखली तालुक्यात शिक्षकांशी प्रा. डी. एस. लहाने यांचा संवाद; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


मेहकर-चिखली तालुक्यात शिक्षकांशी प्रा. डी. एस. लहाने यांचा संवाद; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मेहकर/चिखली : शिक्षक मतदार संघ अमरावती विभागाच्या अनुषंगाने आज मेहकर व चिखली तालुक्यातील विविध शाळांना भेटी देत प्रा. डी. एस. लहाने यांनी शिक्षकांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी विविध शाळांमधील शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे संवाद साधत आपल्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा त्यांच्या समोर मांडल्या.

शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, ही आपली भूमिका असल्याचे प्रा. डी. एस. लहाने यांनी यावेळी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर शिक्षकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

मेहकर व चिखली तालुक्यातील शिक्षकांनी प्रा. लहाने यांच्या संवादाला उत्तम प्रतिसाद देत त्यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

शिक्षकांचा विश्वास, संवाद आणि सहकार्य हीच पुढील वाटचालीची ताकद असल्याचे प्रा. डी. एस. लहाने यांनी यावेळी नमूद केले.


SHIVSAI DARPAN

संपादक : राहुल गवई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *