सामाजिक

मौलाना आझाद उर्दू हायस्कूलमध्ये लहाने सरांच्या हस्ते ध्वजारोहण


मौलाना आझाद उर्दू हायस्कूलमध्ये लहाने सरांच्या हस्ते ध्वजारोहण

 

स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना देशप्रेम व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले

 

बुलढाणा : मौलाना आझाद उर्दू हायस्कूल, बुलढाणा येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक मतदारसंघ अमरावती विभागाचे प्रा. डी. एस. लहाने सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन केले. यावेळी प्रा. डी. एस. लहाने सर यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

 

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात लहाने सरांनी स्वातंत्र्याचे महत्त्व, देशाप्रती असलेली जबाबदारी आणि शिक्षणाची समाजाच्या प्रगतीतील भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबासोबतच समाज आणि देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शाळेच्या वतीने प्रा. डी. एस. लहाने सरांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच मान्यवरांची उपस्थिती होती.

 

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे शाळेच्या परिसरात देशभक्तीपूर्ण आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


SHIVSAI DARPAN

संपादक : राहुल गवई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *