शिक्षण-प्रशिक्षण

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रेपाळा येथे वृक्षारोपण कार्यक्रम……


सिद्धार्थ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रेपाळा येथे वृक्षारोपण कार्यक्रम……

 

जाफ्राबाद, दि. ७ जुलै : सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जाफ्राबाद येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मौजे रेपाळा, ता. जाफ्राबाद येथे दि. ७ जुलै २०२६ रोजी ‘वन महोत्सव’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सिल्लोड शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. राहुलजी म्हस्के व महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. सविता सिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

पर्यावरण संवर्धन, जैव-विविधतेचे संरक्षण आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. या उपक्रमात ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्याम सर्जे यांनी वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाची गरज तसेच भावी पिढ्यांसाठी हरित वारसा जपण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास रेपाळा गावचे सरपंच गणेश शेळके, उपसरपंच दिलीप देव्हडे, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. कैलास पाटील, प्रा. डॉ. शरद मोहरीर,महाविद्यालयातील प्रसिद्ध प्रमुख प्रा.अनिल वैद्य, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शिवाजी जगतवाड, प्रा. डॉ. प्रदीप मिसाळ, प्रा. सौ. सरिता मनियार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक किरण तिडके व श्रीकांत कारले, शिपाई अंकुश राठोड, एम. के. पवार, शंकर देवडे, ग्रामस्थ तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होण्यास हातभार लागला असून महाविद्यालय व ग्रामस्थ यांच्यातील स्नेहसंबंध अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


SHIVSAI DARPAN

संपादक : राहुल गवई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *