रॉयल सोल्जर अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. डी. एस. लहाने यांची उपस्थिती
रॉयल सोल्जर अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. डी. एस. लहाने यांची उपस्थिती
बुलढाणा, दि. २० ऑगस्ट २०२६ : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सक्षम व दर्जेदार वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रॉयल सोल्जर अभ्यासिकेचा शुभारंभ दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
रॉयल सोल्जर अभ्यासिकेचे संचालक मेजर त्र्यंबक टेकाळे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासिकेच्या उद्घाटन सोहळ्यास प्रा. डी. एस. लहाने यांनी उपस्थिती लावत मेजर त्र्यंबक टेकाळे यांचे स्वागत केले तसेच त्यांच्या या उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रा. लहाने यांनी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे पोषक वातावरण निर्माण करणाऱ्या अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी योग्य सुविधा आणि मार्गदर्शन मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
रॉयल सोल्जर अभ्यासिका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व स्पर्धा परीक्षेच्या वाटचालीत निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करत प्रा. डी. एस. लहाने यांनी मेजर त्र्यंबक टेकाळे व त्यांच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपादक : राहुल गवई
