सिद्धार्थ महाविद्यालयाच्या 16 खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड*..
*सिद्धार्थ महाविद्यालयाच्या 16 खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड*..
जाफराबाद प्रतिनिधी … क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे 1 यांच्या वतीने विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने 14 17 19 वर्षा आतील मुले व मुली शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुली मुलांनी विविध मैदानी क्रीडा प्रकारामध्ये यश संपादन केले या खेळाडूंनी छत्रपती संभाजी नगर, परभणी हिंगोली, बीड या जिल्ह्याच्या संघावर यश संपादन केले. त्यामध्ये सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या 16 खेळाडूंची राज्यस्तरावर निवड झाली असुन मुलांमध्ये राष्ट्रीय खेळाडू आकाश रामेश्वर राठोड याने 1500 मीटर , 3000 मीटर धावणे व क्रॉस कंट्री मध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तसेच आकाश भिसे , आदेश नरवडे , यांनी क्रॉस कंट्री मध्ये,प्रथम क्रमांक पटकावला.व गोळा फेक क्रीडा प्रकारामध्ये रोहन रमेश दांडगे तृतीय क्रमांक पटकाविला मुलींमध्ये 200 मीटर धावण्याच्या क्रीडा प्रकारामध्ये साक्षी उत्तम देवडे हिने प्रथम क्रमांक तसेच 800 मीटर व 1500 मीटर धावणे व क्रॉस कंट्री मध्ये तृप्ती ज्ञानेश्वर जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच भाग्यश्री सुभाष तागवाले हिने 3000 मीटर , धावणे क्रॉस कंट्री मध्ये प्रथम क्रमांक मिळविला व तिहेरी उडी मध्ये प्रतिक्षा कौतिक पवार व प्रज्ञा महादू भिसे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.. 4×400मीटर रिले मध्ये शिवानी गजानन माकोडे, नंदनी तारू , साक्षी देवडे, तृप्ती जाधव, भाग्यश्री तागवाले,तसेच ,4×100 मीटर रिले मध्ये प्रियांका सुभाष जंजाळ ,भावना विजय जाधव, भाग्यश्री ताग वाले, साक्षी देवडे, तृप्ती जाधव, यांनी प्रथम क्रमांक पटकाविला .तसेच सायकलिंग मध्ये राज्यस्तरावर तृप्ती जाधव, श्रद्धा शिंगणे, ऋतुराज जाधव, राहुल लोखंडे यांनी प्रथम क्रमांक मिळवुन महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. सर्व खेळाडूची राज्य स्तरावर निवड झालेली असून सर्व खेळाडू मराठवाडा छत्रपती संभाजी नगर चे नेतृत्व करणार आहेत . या यशाबद्दल सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा . दादासाहेब म्हस्के, सचिव प्रा डॉ. राहुलजी म्हस्के , महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सविता सिनगारे, उपप्राचार्य प्रो.डॉ. सुनील मेढे, उपप्राचार्य डॉ. श्याम सर्जे, सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य विनोद हिवराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नरेंद्र पवार, श्रीमती लता लोंढे, सिद्धार्थ कदम, आरती चिल्लारे, आशिष जोगदंड, उदय बोडके, तालुका क्रीडा संयोजक श्री एकनाथ सुरोशे, प्रमोद खरात, सोपान शिंदे, न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक रमेश मुरकुटे, महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा. अनिल वैद्य , प्रा डॉ.सुनंदा सोनवणे,आकाश छडीदार,अमोल राठोड, अमोल चव्हाण, आत्माराम मरकड संतोष मोरे, सोमेश माघाडे, ओमराज उखर्डे, नंदकिशोर गायके, व तसेच सिद्धार्थ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार बंधू यांनी सर्व खेळाडूंचे सत्कार करून पुढील क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या सर्व खेळाडूंचे तालुक्यातून ते विभागीय स्तरापर्यंत कौतुक व अभिनंदन होत आहे राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा जळगाव येथे संपन्न होणार आहेत या शैक्षणिक वर्षात सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या 21 खेळाडूंची राज्यस्तरावरती निवड झालेली आहे .
या सर्व खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन प्रशिक्षण प्राध्यापक उदय वझरकर, प्राध्यापक वाहेद पटेल, प्रा. शिवाजी वैद्य यांनी केले.

संपादक : राहुल गवई
