उद्योग

सिध्दार्थ नगर येथील लुंम्बुनी बुद्ध विहारात ” बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाची सांगता……


सिध्दार्थ नगर येथील लुंम्बुनी बुद्ध विहारात ” बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाची सांगता……

 

येथिल लुंम्बुनी बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमे पासुन सुरु झालेल्या” बुद्ध आणि त्यांचा धम्म ” या ग्रंथाची सांगता मोठ्या उत्साहात करण्यात आली. जाफराबाद शहरातील लुंम्बुनी बुद्ध विहारात दर वर्षी प्रमाणे याही वर्षी सुरवातीपासूनच या ग्रंथाच्या वाचनास सुरुवात झाली.बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या वाचनाने समाज बांधवांनी भगवान बुद्धांच्या जन्मापासून ते त्यांच्या महापरिनिर्वाणा पर्यंतचा प्रवास वाचन केला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म ग्रंथ २४ ऑक्टोबर १९५१ रोजी लिहिण्यास सुरुवात केली.हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवणातील शेवटचा ग्रंथ त्यांनी लिहिला. या महान ग्रंथाचे वाचन सिध्दार्थ महाविद्यालयाचे प्रा. अनिल वैद्य यांनी अतिशय सुंदर पध्दतीने वाचन करून विहारात येणाऱ्या माता भगिनींना या ग्रंथाच्या वाचनाने सिध्दार्थ गौतम बुद्धाच्या ग्रृहत्यागापासून ते त्यांच्या महापरिनिर्वाणा पर्यंतचा इतिहास समजून सांगितला.या कार्यक्रमाचे आयोजन सिध्दार्थ नगरच्या सर्व माता भगिनींनी केले.श्रध्दावान उपासिका इंदुबाई वाघ,सौ.रेखाबाई आढावे,श्रीमती सिंधुताई बनकर यांनी आषाढ पौर्णिमे पासुन ते आश्विन पौर्णिमे पर्यंत दररोज सकाळी बुद्ध वंदना घेऊन वर्षावातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करुन आदर्श निर्माण केला. सिध्दार्थ नगरच्या सर्व माता भगिनीं, बौद्ध उपासक, श्रद्धावान असल्याने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्राच्या इतिहासात शिक्षण क्षेत्रात मराठवाड्यातील शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या तत्कालीन जाफराबाद तालुक्यांत शिक्षणक्षेत्रात अद्वितीय कामगिरी करुन बहुजनांच्या मुला मुलींना शिक्षणाची सोय करुन देणारे, समाजासाठी अविरतपणे सहकार्याचा हात पुढे करून बौद्ध समाजबांधवांना नेहमी सहकार्य करुन समाज हित जोपासणारे,

सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मा. दादासाहेब म्हस्के यांनी या ग्रंथाच्या समाप्ती कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधवांना अल्पोपहाराची व्यवस्था करुन दिली.याच दिवशी आश्विन पौर्णिमा असल्याने श्रध्दावान उपासिका श्रीमती इंदुबाई वाघ यांनी खीरदान केली.या कार्यक्रमा प्रसंगी श्रीमती इंदुबाई वाघ,सौ.कुसुमबाई राऊत,सौ.धम्मज्योती चव्हाण,व अश्रवजित भिसे श्री.संजीव चव्हाण सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्राप्रसंगी आयु.प्रकाश राऊत,आयु. राजेश वाघ आयु.मधुकर जाधव,दिलीप मगरे, अशोक छडीदार, मच्छिंद्र भिसे, शिवाजी गायकवाड,संजीव चव्हाण सर,आसाराम भाऊ हिवाळे यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमास सिध्दार्थ नगर येथील सर्व समाज बांधवांनी विशेष सहकार्य केले.मोठया संख्येने माता भगिनींनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सुशील वैद्य सरांनी मोलाचे सहकार्य केले.


SHIVSAI DARPAN

संपादक : राहुल गवई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *