उद्योग

जाफराबादच्या एकता दौड मध्ये सिद्धार्थ महाविद्यालय व न्यू हायस्कूल जाफराबाद च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी……….


जाफराबादच्या एकता दौड मध्ये सिद्धार्थ महाविद्यालय व न्यू हायस्कूल जाफराबाद च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी……….

जाफराबाद (प्रतिनिधी) दि.31
31 ऑक्टोबर 2026 रोजी पोलीस स्टेशन जाफ्राबाद यांच्या वतीनं ” थोर स्वातंत्र्य सेनानी व भारत रत्न सरदार वल्लभभाई पटेल ” यांच्या जयंती निम्मित एकता दौड या मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या एकता दौड , क्रीडा स्पर्धेचे उदघाटन जाफ्राबाद पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सतीष जाधव यांनी केले. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस उपनिरीक्षक वासुदेव पवार, प्रा. शेळके, श्री. उत्तमराव दुनगहू ( काका ) श्री.एकनाथराव घाडगे पाटील, प्रा. शिवाजी वैद्य, श्री.
आकाश छडीदार, श्री. भिसे, सागर तारू, ज्ञानेश्वर जाधव, पो.कॉ. कमलाकर लक्कस, महेश वैद्य, नारायण गिरीराम, ज्ञानेश्वर सुरूसे, ओमप्रकाश नागरे, अनिल जोशी, संदीप गवई, अनिल दोरे व महिला पोलीस कॉन्स्टेबल साक्षी पंडित, मीना बनकर, संगीता वाघ व तालुक्यातून आलेले सर्व नागरिक , महिला खेळाडू उपस्थित होते. या एकता दौडीचा उद्देश देशाची एकता, अखंडता व बंधू भाव जपणे, तसेच विद्यार्थी व खेळाडू यांच्या मध्ये राष्ट्रीय एकात्मता , सामाजिक सलोखा आणि देश प्रेमाची भावना रुजवणे होता. या एकता दौडीच्या स्पर्धेचे आयोजन जाफ्राबाद पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात आले. या एकता दौड स्पर्धेत जाफराबाद तालुक्यातील पुरुष व महिला , मुले-मुली यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना जाफ्राबाद पोलीस स्टेशनच्या वतीनं बक्षिसं व ट्रॉफी देण्यात आली. या एकता दौड मैदानी स्पर्धेमध्ये जाफ्राबाद तालुक्यातील व शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवीला होता.
या स्पर्धा अहिल्यादेवी होळकर चौक ते सवारखेडा रोडावर संपन्न झाल्या . एकता दौड स्पर्धे मध्ये एकता आमची..,अखंडता आमचा संकल्प, व एकसंघ भारत..,असा होता. या क्रीडा स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक .. सतीष निक्कम, द्वितीय क्रमांक ऋतुराज जाधव, तृतीय क्रमांक सुरज भालके, व मुलीमध्ये प्रथम क्रमांक कु.तृप्ती जाधव, द्वितीय कमांक कु.रागीणी परदेशी, तृतीया क्रमांक कु.प्रांजल तारू, कु.शिवानी माकोडे यांनी यश संपादन केले. व या क्रीडा स्पर्धेमध्ये डिफेन्स फिजिकल अकॅडमीच्या सर्व खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जाफ्राबाद पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धेत जाफराबाद येथिल मराठवाड्यात च नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासात जालना जिल्ह्यातील एकमेव गोर- गरिबांच्या मुला-मुलींना सर्वंच बाबतीत त्यांच्या व्यक्तिमत्व विकासा सोबतच क्रीडा जगतात खेळाडूंनी यश संपादनासाठी केलेल्या परीश्रमा साठी व महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला या साठी आमच्या सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मा . दादासाहेब म्हस्के, संस्थेचे सन्मानीय सचिव प्रा. डॉ. राहुलजी म्हस्के ,प्राचार्य डॉ. सविता सिनगारे, उपप्राचार्य प्रो. डॉ. सुनील मेढे, उपप्राचार्य प्रा. डॉ. श्याम सर्जे, सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे, न्यू हायस्कूलचे मुख्यध्यापक श्री . रमेश मुरकुटे, प्रा. उदय वाझरकार, प्रा. वाहेद पटेल, प्रा. सिध्दार्थ महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.अनिल वैद्य, क्रीडा शिक्षक प्रा.शिवाजी वैद्य, आकाश छडीदार यांनी या सर्व खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले…..


SHIVSAI DARPAN

संपादक : राहुल गवई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *