सिद्धार्थ महाविद्यालयाच्या चार खेळाडूंची सायकलिंग मध्ये राज्यस्तरावर निवड :-
-:सिद्धार्थ महाविद्यालयाच्या चार खेळाडूंची सायकलिंग मध्ये राज्यस्तरावर निवड :-
जाफराबाद (प्रतिनिधी) दि.१५
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे-१ व जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यामानाने ओरिक टाउन शिप. एम. आय. डीसी. शेंद्रा, येथे विभागीय शालेय सायकलिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेचे अध्यक्ष क्रीडा अधिकारी गणेश मालोदे हे होते. तर उद्घाटक म्हणून करमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सम्राट सिंग राजपूत हे होत. उद्घाटनिय भाषणामध्ये खेळाडूंना मार्गदर्शन करीत असताना खेळाडूंनी आपल्या विभागाचे व राज्याचे नाव आंतरराष्ट्रीय लेवल पर्यंत करावे. व खेळाडूंनी स्वतःला कमी समजू नये आपल्या खेळावर खेळाडूंनी आत्मविश्वास ठेवावा. असे प्रतिपादन केले.

या सर्व क्रीडा स्पर्धामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये भिकन अंबे, तेजस सोनलकर, प्रा. वाहेद पटेल, ज्ञानेश्वर जाधव, सुरज शिंगणे, अश्विनी शिंदे, श्रद्धा भिकणे, पो. कॉ. सोपान बकले व विभागीय स्तरावर आलेले सर्व क्रीडा शिक्षक व सायकलिंग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शालेय 14,17,19 वर्षातील मुले-मुली जालना, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर येथून क्रीडा स्पर्धा साठी खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विभागीय स्तरावर अजिंक्यपद पटकवले. खेळाडूंनी सायकलिंग मध्ये मास स्टार्ट, व टाईम ट्रायल यामध्ये यश संपादन केले. मुलांमध्ये ऋतुराज जाधव, राहुल लोखंडे व मुलींमध्ये तृप्ती जाधव, श्रद्धा शिंगणे यांनी यश संपादन केले. या राज्यस्तरीय स्पर्धा अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे. हे सर्व खेळाडू छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या क्रीडा स्पर्धेत यश संपादन केल्यामुळे अध्यक्ष आयुष्यमान दादासाहेब मस्के, सचिव प्रा. डॉ. राहुल भाऊ मस्के, प्राचार्य डॉ. सविता सिनगारे, उपप्रचार्य डॉ. सुनील मेढे, उपप्राचार्य डॉ. श्याम सर्जे, सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य विनोद हिवराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जालना श्री. नरेंद्र पवार, लता लोंढे, आरती चील्लारे, सिद्धार्थ कदम, आशिष जोगदंड, प्राचार्य गडकरी, व सिद्धार्थ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनींनी खेळाडूंचे सत्कार करून पुढील क्रीडा स्पर्धेसाठी शुभकामना दिल्या या सर्व खेळाडूंचे अभिनंदन कौतुक होत आहे. या सर्व खेळाडूंना छत्रपती संभाजी नगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश मालोदे यांनी गोल्ड मेडल देऊन सत्कार केले.
या सर्व खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण प्रा. उदय वझरकर, प्रा. वाहेद पटेल, प्रा. शिवाजी वैद्य, श्री. आकाश छडीदार यांनी केले.
टीप: खेळाडूंसोबत सिल्लोड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आयुष्यमान दादासाहेब मस्के, सचिव प्रा. राहुल भाऊ मस्के हे खेळाडूंसोबत दिसत आहे.

संपादक : राहुल गवई
