*मोबाईल मुळे विद्यार्थ्यांची वाचणाची सवय कमी होत आहे*…….. प्रो. डॉ.सुनिल मेंढे.
*मोबाईल मुळे विद्यार्थ्यांची वाचणाची सवय कमी होत आहे*…….. प्रो. डॉ.सुनिल मेंढे.
जाफ्राबाद-
सिध्दार्थ महाविद्यालय जाफ्राबाद येथे सामाजिकशास्त्रे मंडळाच्या अध्यक्षीय समारोप करतांना
सामाजिकशास्त्रे मंडळ हे विद्यार्थ्यांवर सामाजिकरणाचे संस्कार करून विद्यार्थ्यांचे सामाजिकरण घडवून आणु शकते. सामाजिक शास्त्रामधील प्रत्येक विषय हा समाजातील घटकाला जीवन जगण्यासाठी उपयुक्त होऊ शकतो, तसेच आजच्याच जे सामाजिक प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. डाॅ. मेढे पुढे म्हणाले की, आजच्या युगात विद्यार्थी पुस्तकापेक्षा मोबाईलला जास्त जवळ करीत आहेत, पण मोबाईल किंवा चॅट जीपीटीसारखे सामाजिक प्रसारणाची माध्यम हे डेटावर अवलंबून आहेत तर पुस्तक हे डेटा पुरवठादार आहे त्यामुळे पुस्तक वाचणे हे विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाठी आवश्यक आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून छत्रपती शिवाजी महाविद्यालय, जाफ्राबाद चे प्राचार्य डॉ. समाधान आमले होते.

आपल्या उद्घाटकीय भाषणात डॉ. आमले यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना सांगितले की आजचा विद्यार्थी हा बहुआयामी आहे त्याला आपण एका साच्यात किंवा एका विषयापुरता मर्यादित करू शकत नाही तर तो बहुआयामी आहे व त्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये विचार करण्यात आला आहे. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासात मूल्यशिक्षण हे किती आवश्यक आहे याचे काही उदारणे विद्यार्थ्यांसमोर ठेवली. आजच्या स्पर्धेच्या युगात जे विद्यार्थी स्कीलयुक्त बहुआयामी शिक्षण घेतील तेच विद्यार्थी टीकतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे समन्वयक प्रा. संजय साळवे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. एस. आर. पहारे यांनी केले. कार्यक्रमास सामाजिकशास्त्रे मंडळाचे सर्व सदस्य, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सिध्दार्थ पैठणे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा अनिल वैद्य यांचीही उपस्थिती होती.कार्यक्रमासाठी डाॅ. एम. जी. मोरे, डॉ. मदन मगरे, प्रा. एस. एम. पवार, प्रा. उत्तम वाघ, प्रा. रविंद्र चौधरी, प्रा. जितेंद्र वाघ, प्रा. वंसत म्हस्के, वैभव फदाट यांनी परिश्रम घेतले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

संपादक : राहुल गवई
