जालना झोन मैदानी स्पर्धेत ” सिद्धार्थ महाविद्यालयाची दमदार कामगिरी……..
” जालना झोन मैदानी स्पर्धेत ” सिद्धार्थ महाविद्यालयाची दमदार कामगिरी……..
पार्थ सैनिकी स्कूल जालना येथे पार पडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत अंतर महाविद्यालयीन जालना झोन स्पर्धेत सिद्धार्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.महाविद्यालयाची खेळाडू कु . दिव्या सिद्धेश्वर वाकडे हिने ” हॅमर थ्रो ” या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला,कु.सानिका शिवहरी सोरमारे पंधराशे मीटर धावणे मध्ये प्रथम , कु.सानिया अयुबखाॅं पठाण आठशे व पाच किलोमीटर धावणे मध्ये प्रथम, कु.स्नेहल विनय नाटेकर 400 मीटर धावणे मध्ये द्वितीय ,तर
या सर्व मुलींनी 400 मीटर रिले मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मुलांमध्ये रोहित गौतम कदम हा 200 मीटर मध्ये तृतीय, समीर मुश्ताक शेख लांब उडीत तृतीय ,नागेश लक्ष्मण जाधव याची दहा किलोमीटर धावणे स्पर्धेसाठी वैजापूर येथे निवड झाली आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. दादासाहेब म्हस्के ,सचिव मा. डॉ.राहुलजी म्हस्के , प्राचार्या मा. डॉ.सविता सिनगारे ,उपप्राचार्य प्रो. डॉ. सुनील मेढे उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.अनिल वैद्य या सर्वांनी अभिनंदन केले. तसेच खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन प्रा. उदय वझरकर,प्रा. वाहेद पटेल, प्रा. शिवाजी वैद्य यांचे लाभले.

संपादक : राहुल गवई
