राजकीय

शिक्षक मतदारसंघ अमरावती विभागातून प्रा. दत्तात्रय लहाने यांना अधिकृत उमेदवारी


शिक्षक मतदारसंघ अमरावती विभागातून प्रा. दत्तात्रय लहाने यांना अधिकृत उमेदवारी

बुलढाणा : शिक्षक मतदारसंघ अमरावती विभाग विधानपरिषद निवडणूक २०२६ साठी प्रा. दत्तात्रय (डी. एस.) लहाने यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रा. लहाने यांच्या उमेदवारीची घोषणा केली. शिक्षकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी तसेच शिक्षकांचे हक्क, सन्मान आणि विविध प्रलंबित प्रश्न विधानपरिषदेत मांडण्यासाठी प्रा. लहाने यांना पक्षाने संधी दिली आहे.

यावेळी शिवसेना नेते तथा खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते तथा खासदार अनिल देसाई, आमदार अ. मो. अभ्यंकर, बुलडाणा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, प्रवक्त्या जयश्री ताई शेळके यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रा. लहाने यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने अमरावती विभागातील शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांशी व्यापक संवाद आणि जनसंपर्कावर भर देण्यात येणार आहे.

‘मशाल’ या निवडणूक चिन्हासह प्रा. दत्तात्रय लहाने यांची उमेदवारी आता अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरली आहे.


SHIVSAI DARPAN

संपादक : राहुल गवई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *