आ. अंबादास दानवे यांची बुलडाणा दौऱ्यात प्रा. डी. एस. लहाने सरांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
आ. अंबादास दानवे यांची बुलडाणा दौऱ्यात प्रा. डी. एस. लहाने सरांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
शिक्षक मतदारसंघ अमरावती विभाग निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चर्चा
बुलडाणा : महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार आ. अंबादास दानवे यांच्या बुलडाणा जिल्हा दौऱ्यादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बुलडाणा जिल्हा सहसंपर्क प्रमुख प्रा. डी. एस. लहाने यांनी त्यांची भेट घेऊन शिक्षक मतदारसंघ अमरावती विभाग निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली.
शेगाव-खामगाव दौऱ्यादरम्यान झालेल्या या भेटीत पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके, बुलडाणा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा सहसंपर्क प्रमुख प्रा. डी. एस. लहाने आणि जिल्हा समन्वयक गजानन धांडे उपस्थित होते.

यावेळी प्रा. डी. एस. लहाने यांनी अमरावती विभागातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांकडे आ. अंबादास दानवे यांचे लक्ष वेधत शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी प्रभावीपणे भूमिका मांडण्याबाबत चर्चा केली. शिक्षकांच्या समस्या, त्यांच्या प्रलंबित मागण्या तसेच शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी याबाबत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
शिक्षकांशी सातत्याने संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणे आणि अमरावती विभागातील शिक्षकांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचविणे, या अनुषंगानेही यावेळी चर्चा झाली.
आगामी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रा. डी. एस. लहाने यांचा शिक्षकांशी असलेला सातत्यपूर्ण संवाद आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठीची सक्रिय भूमिका या भेटीतून पुन्हा अधोरेखित झाली.

संपादक : राहुल गवई
