राजकीय

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची बुलढाणा जिल्हा पदाधिकारी बैठक उत्साहात संपन्न!


🚩 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची बुलढाणा जिल्हा पदाधिकारी बैठक उत्साहात संपन्न!

 

बुलढाणा येथील अर्बन रेसिडेन्सी येथे आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

बैठकीत पक्ष संघटन अधिक मजबूत करणे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती, तसेच विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेत BLA यांच्या सक्रिय सहभागावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

यावेळी पक्ष प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हासंपर्कप्रमुख प्रा. नरेंद्रभाऊ खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधरभाऊ बुधवत, जिल्हाप्रमुख गजाननभाऊ वाघ, आमदार सिद्धार्थजी खरात, सहसंपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, वसंतरावभाऊ भोजने, प्रा. डी. एस. लहाने, जिल्हासंघटक सुमितजी सरदार, युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे, शुभम पाटील, मेहकर नगराध्यक्ष किशोरभाऊ गारोळे, किसानसेना प्रमुख वसंतराव झाल्टे, प्रसिद्धीप्रमुख गजाननभाऊ धांडे तसेच जिल्हाभरातील उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

 

विचार, निष्ठा आणि संघटनाच्या बळावर शिवसेना अधिक जोमाने पुढे वाटचाल करेल! 🚩


SHIVSAI DARPAN

संपादक : राहुल गवई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *