शिक्षण-प्रशिक्षण

शिक्षक मतदारसंघाचा दावेदार शिक्षक असावा – प्राचार्य विष्णुपंत पाटील


शिक्षक मतदारसंघाचा दावेदार शिक्षक असावा – प्राचार्य विष्णुपंत पाटील

बुलढाणा, दि. २० : शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव असणारा आणि शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा व्यक्तीच शिक्षक मतदारसंघाचा खरा हक्कदार असला पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य विष्णुपंत पाटील यांनी केले.

बुलढाणा येथील शिवसाई युनिव्हर्सल येथे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डी. एस. लहाने होते. यावेळी डॉ. वसंत चिंचोळे, प्रा. राम बारोटे, देवडे, प्रा. मनोज वानखेडे, प्रा. उबरहांडे, डी. आर. माळी, बकाल आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्राचार्य पाटील पुढे म्हणाले की, आज सर्व काही मिळते; मात्र समाजासाठी काम करणारी चांगली माणसे शोधावी लागतात. समाजाची तळमळ आणि समाजसेवेचे व्रत अंगी असणाऱ्या व्यक्तींची आज गरज आहे. प्रा. डी. एस. लहाने हे शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करीत असून, त्यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे.

लहाने यांनी विधवा विवाह चळवळीपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. शिक्षकांच्या अडचणी आणि समस्या ते जवळून जाणून घेत आहेत. शिक्षक हा त्यांचा मूळ पिंड असून, शिक्षकी पेशा आणि स्वाभिमान हीच त्यांची ओळख आहे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी ते प्रभावीपणे आवाज उठवू शकतात, असेही पाटील यांनी नमूद केले.

यावेळी प्रा. डी. एस. लहाने यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक राहुल हिवाळे यांनी केले. शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


SHIVSAI DARPAN

संपादक : राहुल गवई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *