सामाजिक

आंतरराष्ट्रीय युवा दिन व ‘हर घर तिरंगा’ जनजागृती रॅली उत्साहात


आंतरराष्ट्रीय युवा दिन व ‘हर घर तिरंगा’ जनजागृती रॅली उत्साहात

 

जाफराबाद, दि. १२ ऑगस्ट २०२६ : आंतरराष्ट्रीय युवा दिन तसेच स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जाफराबाद येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सविता शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्याम सर्जे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रॅलीमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाविषयी आदर, देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एल. मेढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. युवकांनी देशाच्या विकासात सक्रिय सहभाग घेऊन राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावे, तसेच राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि देशप्रेमाची भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.

रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. पी. जगतवाड, प्रा. डॉ. प्रदीप मिसाळ, प्रा. डॉ. सारिका जाधव, प्रा. सरिता मणियार आणि प्रा. ए. आर. वैद्य यांनी परिश्रम घेतले. रॅलीची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


SHIVSAI DARPAN

संपादक : राहुल गवई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *