राजकीयसामाजिक

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप


उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप
बुलढाणा, दि. २५ जुलै : शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा उपक्रम प्रा. डी. एस. लहाने यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असून, शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळकटी देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डी. एस. लहाने (अध्यक्ष, शिवसाई परिवार बुलढाणा जिल्हा, सह संपर्क प्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बुलढाणा जिल्हा, शिक्षक मतदार संघ अमरावती विभाग) आहेत.
कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :
सकाळी ७.३० वा. – शिवाजी हायस्कूल, बुलढाणा
सकाळी ८.०० वा. – जिल्हा परिषद शाळा, बीरसिंगपूर
सकाळी ९.०० वा. – जिल्हा परिषद शाळा, देऊळघाट
सकाळी १०.०० वा. – जिल्हा परिषद शाळा, नांद्राकोळी
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणारा हा सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. तसेच संबंधित शाळांतील शिक्षक, पालक व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


SHIVSAI DARPAN

संपादक : राहुल गवई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *