सत्यसाई सेवा समितीच्या वतीने शिवसाई युनिव्हर्सल कॉलेजमध्ये वृक्षारोपण
सत्यसाई सेवा समितीच्या वतीने शिवसाई युनिव्हर्सल कॉलेजमध्ये वृक्षारोपण
बुलडाणा : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सत्यसाई सेवा समिती, बुलडाणा यांच्या वतीने शिवसाई युनिव्हर्सल कॉलेज परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली. यावेळी प्रा. डी. एस. लहाने यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विशद करत प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास श्री. चोपडे, श्री. देशमुख तसेच सत्यसाई सेवा समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संवर्धन करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सत्यसाई सेवा समिती, बुलडाणा यांच्या वतीने करण्यात आले.

संपादक : राहुल गवई
