जालिंदर बुधवत यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड
जालिंदर बुधवत यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड
बुलडाणा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बुलडाणा जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांची बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जालिंदर बुधवत यांनी पक्षाच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले आहे. सामाजिक, राजकीय तसेच सहकार क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रा. डी. एस. लहाने यांच्याकडून अभिनंदन
जालिंदर बुधवत यांच्या निवडीबद्दल प्रा. डी. एस. लहाने, अध्यक्ष शिवसाई परिवार बुलडाणा जिल्हा तथा सह संपर्क प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिक्षक मतदार संघ अमरावती विभाग यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, पुढील सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
बुधवत यांच्या नेतृत्वातून बुलडाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

संपादक : राहुल गवई
