राजकीय

डॉ. राजेंद्र शिंगणे यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड; शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन


डॉ. राजेंद्र शिंगणे यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड; शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

 

बुलडाणा : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांची बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

 

डॉ. राजेंद्र शिंगणे यांची सहकार क्षेत्रातील दीर्घकाळाची वाटचाल, अनुभव आणि नेतृत्वाची क्षमता लक्षात घेता त्यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी झालेली बिनविरोध निवड ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यांच्या अनुभवाचा जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी निश्चितच फायदा होईल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हा अध्यक्ष जालिंदर बुधवत, जिल्हा सहसंपर्क प्रमुख प्रा. डी. एस. लहाने, जिल्हा समन्वयक गजानन धांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी, सभासद तसेच सहकार क्षेत्राशी संबंधित विविध घटकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा सकारात्मक उपयोग होईल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


SHIVSAI DARPAN

संपादक : राहुल गवई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *