उद्योग

अकोल्यात आमदार नितीन बापू देशमुख यांची सदिच्छा भेट; शिक्षकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा…


अकोल्यात आमदार नितीन बापू देशमुख यांची सदिच्छा भेट; शिक्षकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा

 

अकोला : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या प्रचार दौऱ्यादरम्यान उमेदवार प्रा. डी. एस. लहाने यांनी अकोला जिल्ह्यात आमदार नितीन बापू देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर, शैक्षणिक क्षेत्रातील सध्याच्या आव्हानांवर तसेच शिक्षकांच्या हक्कांसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

संवादादरम्यान प्रा. डी. एस. लहाने यांनी अमरावती विभागातील शिक्षकांच्या अपेक्षा, अडचणी आणि भविष्यात शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन विधानपरिषदेत प्रभावीपणे आवाज उठविण्याची भूमिका स्पष्ट केली. तसेच शिक्षक मतदारसंघातील आगामी प्रचाराची दिशा, शिक्षकांशी थेट संवाद वाढविणे आणि संघटित पद्धतीने जनसंपर्क अधिक बळकट करण्याबाबतची भावी रणनीतीही त्यांनी मांडली.

 

आमदार नितीन बापू देशमुख यांनीही शिक्षकांच्या समस्या गांभीर्याने सोडविण्यासाठी सकारात्मक सहकार्याची भूमिका व्यक्त केली. शिक्षकांच्या हिताचे प्रश्न सक्षमपणे मांडण्यासाठी परस्पर समन्वयातून कार्य करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बुलडाणा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बुलडाणा जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. डी. एस. लहाने यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 

या भेटीमुळे शिक्षक मतदारसंघाच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले असून, शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी व्यापक पातळीवर प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


SHIVSAI DARPAN

संपादक : राहुल गवई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *