सामाजिक

देऊळघाट येथील आगग्रस्त कुटुंबाला प्रा. डी. एस. लहाने यांच्याकडून तात्काळ मदतीचा हात


देऊळघाट येथील आगग्रस्त कुटुंबाला प्रा. डी. एस. लहाने यांच्याकडून तात्काळ मदतीचा हात

बुलढाणा, दि. ३० जुलै : देऊळघाट येथील इरफान खान (बब्बू खान) यांच्या घराला काल मध्यरात्री अचानक फ्रिजचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, फर्निचर, कपडे व इतर आवश्यक वस्तू जळून खाक झाल्याने संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रा. डी. एस. लहाने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्वरित ₹10,000 ची आर्थिक मदत जाहीर करून सुपूर्द केली.

यावेळी बोलताना प्रा. लहाने म्हणाले, “अशा संकटाच्या काळात समाजाने एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी माणुसकी आहे. आगग्रस्त कुटुंबाला भविष्यात लागणारी सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.”

प्रा. लहाने यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे आगग्रस्त कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, उपस्थित नागरिकांनी त्यांच्या तत्पर मदतकार्याचे कौतुक केले.


SHIVSAI DARPAN

संपादक : राहुल गवई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *