शिक्षण-प्रशिक्षण

शिवसाई ज्ञानपीठ स्कूल, बुलढाणा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी


शिवसाई ज्ञानपीठ स्कूल, बुलढाणा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

वार्ताहर : मंजिरी जाधव
दि. १८ जुलै २०२६

शिवसाई ज्ञानपीठ स्कूल, बुलढाणा येथे लोकशाहीर, साहित्यरत्न तथा महान समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी अत्यंत आदरपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य प्रमोद मोहरकर सर तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्या मुले मॅडम यांची होती. कार्यक्रमाची सुरुवात सौ. सी. उबरहांडे मॅडम यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त परिचय करून दिला.

यावेळी इयत्ता आठवीतील प्राची काळवाघे तसेच इयत्ता सातवीतील ओवी वाघ आणि श्रुष्टी इंगळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवास, सामाजिक कार्य, साहित्यसेवा आणि वंचित समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या संघर्षावर प्रभावी मनोगते व्यक्त केली. त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना समता, सामाजिक न्याय आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

यानंतर पर्यवेक्षिका बंगाळे मॅडम यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.

अल्पावधीत संपन्न झालेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि मूल्यसंस्कार वाढविणारा ठरला.


SHIVSAI DARPAN

संपादक : राहुल गवई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *