सामाजिक

पत्रकार गणेश निकम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


पत्रकार गणेश निकम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 

बुलढाणा, प्रतिनिधी : बुलढाणा येथील शिवसाई ज्ञानपीठ स्कूल येथे पत्रकार गणेश निकम यांचा वाढदिवस शिवसाई परिवाराच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

 

यावेळी शिवसाई परिवाराचे अध्यक्ष प्रा. डी. एस. लहाने यांच्या हस्ते गणेश निकम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित पत्रकार बांधव, शिवसाई परिवाराचे सदस्य तसेच मानस फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या पत्रकारितेतील कार्याचे कौतुक केले.

 

यावेळी प्रा. डी. एस. लहाने यांनी पत्रकार गणेश निकम यांना भावी आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात अधिक यश मिळावे, अशा शुभेच्छा दिल्या. उपस्थितांनी केक कापून वाढदिवस आनंदात साजरा करत मैत्री, स्नेह आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.

 

कार्यक्रमास बुलढाणा येथील पत्रकार बांधव, शिवसाई परिवाराचे सदस्य, मानस फाउंडेशनचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.


SHIVSAI DARPAN

संपादक : राहुल गवई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *