सामाजिक

प्रा. दत्तात्रय श्रीराम लहाने यांचा अरुणाई पुरस्कार देऊन गौरव


. दत्तात्रय श्रीराम लहाने यांचा ‘अरुणाई पुरस्कार’ प्रदान करून गौरव
बुलढाणा | प्रतिनिधी
विश्व फाउंडेशनच्या वतीने श्रीमती अरुणाताई कुल्ली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित पाचव्या स्मृतिदिनानिमित्त ‘अरुणाई पुरस्कार’ सोहळा उत्साहात संपन्न झाला. सामाजिक, शैक्षणिक व मानवसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत मानस फाउंडेशन, बुलढाणाचे अध्यक्ष प्रा. दत्तात्रय श्रीराम लहाने यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘अरुणाई पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात इस्रो, बेंगळुरू येथील ‘मिशन गगनयान’साठी निवड झालेले अंतराळवीर ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप यांनी “लढाऊ वैमानिकाचे मन, अंतराळवीराचे हृदय” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान देत उपस्थितांना प्रेरित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्नल सुहास जनकर होते. तसेच कॅप्टन एम. महेंद्र कुमार व श्री. उदय देशपांडे यांची विशेष उपस्थिती लाभली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रा. दत्तात्रय श्रीराम लहाने यांनी हा सन्मान समाजसेवा, शिक्षण व मानवतेच्या कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.


SHIVSAI DARPAN

संपादक : राहुल गवई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *