सेंट अँन्स इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी उत्साहात
📰 सेंट अँन्स इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी उत्साहात
खामगाव, दि. १२ : येथील सेंट अँन्स इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी नव्याने निवडून आलेल्या विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकीनंतर सकाळी पदाधिकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नेतृत्वगुण, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक उत्तरदायित्व या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शालेय जीवनात विकसित होणारे नेतृत्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सिस्टर रत्ना मेरी होत्या. यावेळी शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थी मंत्रिमंडळात नीरज कुरील व ईशरी सोनटक्के यांची शालेय प्रमुख, तर अनंत गोहेले व अथर्व टाले यांची उपप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. क्रीडा विभागासाठी विराट देशमुख व प्रणव दुतोंडे, तर सांस्कृतिक विभागासाठी सिद्धिका गिहे व गौरांगी बनसोड यांची निवड झाली. तसेच रेड गटासाठी आदित्य राहुणे व लावण्या ताठे, ब्ल्यू गटासाठी ओवी सदाशिव व शिवम सातव, ग्रीन गटासाठी अथर्व टाले व अमन फातिमा, तसेच यलो गटासाठी गुरुपाल सिंग व अनुष्का गव्हाळे यांची गटप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.
शपथविधीनंतर सर्व विद्यार्थी पदाधिकाऱ्यांनी शाळेची गौरवशाली परंपरा जपत प्रामाणिकपणे, शिस्तबद्धपणे व जबाबदारीने आपल्या कर्तव्याचे पालन करण्याचा संकल्प व्यक्त केला.

याप्रसंगी शिवसाई परिवार बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष, शिक्षक मतदार संघ अमरावती विभागाचे नेते तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बुलढाणा जिल्हा सहसंपर्क प्रमुख प्रा. डी. एस. लहाने यांनी विद्यार्थी मंत्रिमंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक, सामाजिक व नेतृत्वपूर्ण वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी जपत शाळेचे, पालकांचे व समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संपादक : राहुल गवई
